आमच्याविषयी -

एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म आणि सोबतच आपल्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे कोणतेही काम करत असताना, ते आपल्या मातीशी संलग्न राहूनच करायचे अशी लहानपणापासूनची मिळालेली शिकवण आणि ग्रामदैवत ‘माऊली’चा आशीर्वाद घेऊन खेडेगावातून दूर मुंबईमध्ये आल्यावर मुंबईमधील महानगरपालिका उपहारगृहामध्ये काम करत असताना आलेला अनुभव तसेच ग्राहकांना हवी असलेली चव ओळखून उपहारगृहासोबत सुरू केलेला कॅटरिंग व्यवसाय, तसेच त्यातून खवयांची मिळणारी पसंती आणि प्रेम यातूनच एका “काठ आणि घाट” या संकल्पनेचा जन्म झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोकण सीमाभागात जन्मल्यामुळे दोन्ही प्रकारच्या चवीची ओळख आणि आवड अगदी लहानपणापासूनच होती, म्हणून ग्रामदैवत ‘माऊली’ या नावानेच हॉटेल माऊली ब्रॅंडची पहीली शाखा एक दशकापूर्वी मुंबईमधील वडाळा-दोस्ती परिसरामध्ये सुरू केली. त्याला एक दशक पूर्ण झाले.

वडाळा येथील रसिक खवयांच्या प्रेमावर उभा राहिलेला ‘हॉटेल माऊली’ हा ब्रॅंड आता चार यशस्वी शाखांचा भक्कम विस्तार करून आपला अभिमान सांभाळत, आज यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे, सोबत १५० पेक्षा अधिक कुटुंबाची जबाबदारी आणि आपलेपणा देखील जोपासत आहे.

धन्यवाद!
माऊली परिवार.

Go To Top